
येळ्ळूर : ज्यांच्याकडे शारीरिक तंदुरुस्ती आहे तोच आजच्या काळात खरा श्रीमंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी व्यसनापासून दूर राहून सदृढ आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे असे उद्गार वेदांत को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक व निवृत्त शिक्षक श्री. जयवंत खन्नूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
सन 2023-24 शैक्षणिक वर्षातील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा 11 व 12 जानेवारी रोजी पार पाडल्या. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वाय. एन. मजूकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सीए अमर चिल्हाळ व्हाईस चेअरमन वेदांत को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यानी सुरेख असे पथसंचलन करून उपस्थितांची मने जिंकली.
श्री चांगळेश्वरी मंदिरातून आणलेल्या क्रीडा ज्योतीचा स्वीकार उपस्थित पाहुण्यांनी केला व क्रीडा शिक्षक व शाळेची मुख्यमंत्री कु. करुणा मजुकर हिने विद्यार्थ्यांना शपथ देववीली. याप्रसंगी सुरेख ऑफसेटचे मालक व नेताजी सोसायटीचे चेअरमन श्री. डी. जी. पाटील व जयवंत खन्नूरकर सर यांनी क्रीडा साहित्याची पूजन केले. तर ग्राउंडचे पूजन न्यू अमृत एंटरप्राईजेसचे मालक व वेदांत सोसायटीचे संचालक, उद्योजक श्री. कृष्णा सायनेकर व सीए श्री. जयकुमार पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी बोलताना डी. जी. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी खेळण्यासाठी प्रयत्न करून यश मिळवावे सचिन तेंडुलकर उच्चशिक्षित नसतानाही क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून पहिला भारतरत्न पुरस्कार मिळविला.
याप्रसंगी बोलताना सचिव प्रसाद मजूकरनी नजिकच्या काळात मजूकर फाउंडेशनच्या माध्यमातून येळ्ळूरच्या क्रीडापटूना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देण्याचा मनोदय व्यक्त केला.
अध्यक्ष भाषणात श्री. वाय. एन. मजूकर यांनी राष्ट्रीय पातळीवरती पोहचून येळ्ळूरची क्रीडा परंपरा विद्यार्थ्यांनी अशीच चालू ठेवून येळ्ळूरचे नाव उज्वल करा. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये उपजत क्रीडा गुण असतात त्यांचा विकास करा असा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. ए .डी. धामणेकर यांनी केले तसेच उपस्थित पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. कांबळे यांनी तर आभार एल. एस. बांडगे यांनी मांडले.
यावेळी चांगळेश्वरी हायर प्रायमरीचे मुख्याध्यापक राऊत, सहशिक्षक नरेंद्र मजुकर, वाय. बी. कंग्राळकर, क्रीडा शिक्षक एम. एम. डोंबले, श्रीमती यू. व्ही. सावंत, संध्या शिंदे, अरुण घाडी यांनी स्पर्धा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
या स्पर्धेमध्ये मुलांच्या वैयक्तिक खेळामध्ये शालेय क्रीडामंत्री निलेश कणबरकर, सुमित बसरीकट्टी व समर्थ कणबरकर याने तर मुलींच्या मध्ये रेश्मा कुगजी, कनिष्का कुंडेकर, आदिती बिजगरकर यांनी दैदिप्यमान कामगिरी केली तर सांघिक खेळामध्ये मुलांच्या गटात हॉलीबॉलमध्ये घटप्रभात संघ कबड्डीमध्ये शरावती संघ तर मुलींच्या थ्रो बॉलमध्ये कबड्डीमध्ये रिलेमध्ये गंगा संघ अव्वल ठरला.
Belgaum Varta Belgaum Varta