Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव जिल्ह्यातील दैनिकांच्या संपादकांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्य दैनिक संपादक संघ यांच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील दैनिकांच्या संपादकांचा सत्कार संघाच्या बैठकीत बेंगलोर येथे करण्यात आला. दैनिक वृत्तपत्रांच्या अडचणींच्या विषयी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दैनिकांना मिळत असलेल्या जाहिराती आणि त्यांची बीले आणि प्रमाण तसेच दर वाढ या संदर्भात आपण सरकारकडे मागणी करावयाची आहे. यासाठी माहिती संचालक हेमंत निंबाळकर आणि माहिती मंत्री यांना निवेदन देण्याचे या बैठकीत ठरले.

 

या बैठकीनंतर संघाचे अध्यक्ष तिप्पेस्वामी यांच्या नेतृत्वाखाली माहिती संचालक हेमंत निंबाळकर यांची भेट घेण्यात आली. या बैठकीत हेमंत निंबाळकर यांनी सांगितले की, ज्या जाहिरात एजन्सी वृत्तपत्रांना 90 दिवसात जाहिरातीची बीले देणार नाहीत त्या जाहिरात एजन्सीला जाहिराती दिल्या संदर्भात देण्यात येणारे पंधरा टक्के कमिशन दिले जाणार नाही. याबरोबरच सरकारने मंजूर केलेली बीले ज्यानी दिलेली नाहीत त्या जाहिरात एजन्सी विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाच्या वेळी सांगितले. याबरोबरच संघातर्फे राज्यातील दैनिकांच्या इतर अडचणी संबंधातही चर्चा करण्यात आली. आपण दैनिकांना येत असलेल्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन माहिती संचालक हेमंत निंबाळकर यांनी यावेळी दिले. कर्नाटक राज्य दैनिक दैनिक संपादक संघाची बैठक बेंगलोर येथे गांधी भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

Spread the love  बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *