Monday , December 15 2025
Breaking News

…म्हणे राममंदिराच्या ध्वजांवरही कन्नडच पाहिजे : करवेची हास्यास्पद मागणी

Spread the love

 

बेळगाव : उठसुठ मराठीद्वेषाची गरळ ओकणाऱ्या कानडी संघटनांनी आता राममंदिरासारख्या सर्व हिंदूंच्या श्रद्धा-जिव्हाळ्याच्या मुद्यालाही प्रसिद्धीसाठी लक्ष्य केले आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटाने आज राममंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त फडकावलेल्या ध्वजांवर हिंदी मजकूर असल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. बेळगावातील चन्नम्मा चौकात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटाने आज निदर्शने केली. सोमवारी अयोध्या राममंदिरात श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सर्वत्र लावण्यासाठी दिलेल्या श्रीराम आणि हनुमानाचे छायाचित्र असलेल्या ध्वजांवर कन्नडऐवजी हिंदीत मजकूर लिहिल्याचा अजब निषेध त्यांनी केला. याशिवाय दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर कन्नड सक्ती करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष एच. शिवराम गौडा म्हणाले की, अयोध्या राममंदिरात श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सर्वत्र लावण्यासाठी दिलेल्या श्रीराम आणि हनुमानाचे छायाचित्र असलेल्या ध्वजांवर कन्नडऐवजी हिंदीत मजकूर लिहिणे निषेधार्ह आहे. ज्या राज्यात ध्वज लावणार त्या ध्वजांवर त्या राज्याच्या भाषेत मजकूर लिहिणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे सर्व दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकांवर 60% जागेत कन्नड ही अधिकृत भाषा वापरावी. जिल्हा प्रशासनाने याबाबत जनजागृती केलेली नाही. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास आम्ही भाग पाडू असा दावा त्यांनी केला.

आंदोलनात समरसेना बंगळुरूचे अध्यक्ष जगदीश, बेंगळुरू गांधी नगर अध्यक्ष मंजुनाथ, बेंगळुरू संयोजक रमेश, बेळगाव जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकुडी, उपाध्यक्ष अक्सर सडेकर, तालुकाध्यक्ष युनुस हिरेकुडी, उपाध्यक्ष मुस्तका चंदगड, महांतेश रणगट्टीमठ ताहिरा हातेली, जगन्नाथ बामणे, रेश्मा कित्तूर, मल्लिका वागी, महादेवी, अन्नपूर्णा असुरकर, दिलावर पिंडारी, नौशाद कालेमाने, अशपाक थिम्मापुर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

डॉ. अंजलीताईंच्या सेवाभावी वृत्तीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून कौतुक

Spread the love  बेंगळूर : गोवा – दिल्ली विमानप्रवासादरम्यान आपत्कालीन सीपीआर करून एका अमेरिकन महिलेचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *