बेळगाव : येथील श्री छत्रपती शिवाजी काॅलनी टिळकवाडी फुटबॉल क्लबतर्फे शालेय फुटबॉल स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस, फायनल सामने खेळले जाणार आहेत
सलग तीन दिवस हे सामने लेले मैदानावर सुरू आहेत. शहरातील निमंत्रित सोळा संघांनी सहभाग घेतला आहे.
उद्या मुलींचा अंतिम सामना सेंट झेवियर वि.सेंट जोसेफ दुपारी खेळवला जाणार आहे. उद्या शेवटच्या दिवशी मुलांच्या गटातील सामने हेरवाडकर स्कूल, संत मीरा, के.एल.एस., केंद्रीय विद्यालय, सेंट झेवियर या पाच संघातील, दोन संघ अंतिम सामना खेळतील
बेळगाव शहरात फुटबॉल खेळाची मोठी परंपरा आहे. विद्यार्थी दशेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक खेळाडूनी प्राप्त केला आहे.
अशा स्पर्धा आयोजित करून खेळाडू ना प्रेरणा मिळते.
शिवाजी काॅलनी फुटबॉल क्लबतर्फे शालेय स्तरावर खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे ही कौतुकाची बाब आहे.
या क्लबचे पदाधिकारी पवन कांबळे, सागर भोसले, संतोष दळवी, राकेश कांबळे, विक्रम कदम, स्वप्नील पाटील, शिरीष चौगुले, श्रीकांत पाटील, विनायक धामणेकर, आदि मान्यवरांच्या परिश्रमाने अगदी उत्साहात सामने खेळले जात आहेत
रेफरी उमेश मजूकर, कौशिक पाटील, सुदर्शन, सुतार, अखिलेश उत्तम पंचांची भूमिका बजावत आहेत
समालोचक म्हणून वाय. पी. नाईक, संतोष दळवी, सागर भोसले काम पाहत आहेत.
उद्याचे सामने ठिक सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होतील.