
येळ्ळूर : मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला भारदस्त दिग्गज प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत सुरूवात झाली. सर्व मान्यवरांचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने स्वागत केले यानंतर श्री सरवती देवी प्रतिमेचे पूजन एसडीएमसी अध्यक्षा सौ. रुपा श्रीधर धामणेकर यांनी केले, माँ जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ.लक्ष्मी भरत मासेकर यांनी केले. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन श्री सतिश शिवाजी पाटील यांनी केले. श्रीराम चंद्रजीच्या प्रतिमेचे पूजन सतीश नांदूरकर यांनी केले. श्री. जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्री गोविंद टक्केकर यांनी केले तसेच सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. येळ्ळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री. प्रमोद पुंडलिक पाटील यांनी कार्यक्रमाचे श्रीफळ वाढविले. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून श्री. यल्लाप्पा (बाबू) मेलगे यांनी केले. यानंतर शाळेच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर श्री. सातेरी पाखरे यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शिक्षिका सौ.शोभा राजाराम निलजकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यानंतर सांस्कृतीक कार्यक्रमचे उद्घाटन श्री. दुर्गाप्पा ताशिलदार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ऐश्वर्या मेणसे यांनी केले व सौ. के. डी. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व एसडीएमसी सदस्य व सदस्या, सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक , येळ्ळूरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta