Wednesday , March 4 2026
Breaking News

संजीवनी फौंडेशनने भरले विद्यार्थिनीचे शैक्षणिक शुल्क

Spread the love

 

बेळगाव : पैसे नसल्याने शिक्षणापासून वंचित राहू नये, समाजातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच असहाय्य वृद्धांना मदत करणेसाठी संजीवनी संस्था कार्यरत असते.
संजीवनी फौंडेशनने गेल्या तीन वर्षांपासून विभा कडोलकर या उषाताई गोगटे कन्या विद्यालयात तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे.
विभाचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी संजीवीनी फौंडेशनने पुढाकार घेऊन ८२०० रुपयांचा धनादेश संजीवनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांच्याहस्ते सुपूर्द केला.
यावेळी संचालिका रेखा बामणे, श्री. गोपालकृष्ण कडोलकर आणि राधा कडोलकर उपस्थित होते.
विभाच्या पालकांनी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *