अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी विमल फौंडेशनचा अभिवादन कार्यक्रम
बेळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आज साजरा करण्यात आला. विमल फौंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अटलबिहारी वाजपेयी यांनी देशहितासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. जय जवान, जय किसान बरोबरच जय विज्ञान चा नारा त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत देण्यात आला. पोखरण येथे पहिली अणुचाचणी करून भारत देश आण्विक अस्त्रात मागे नाही, हे दाखवून देतानाच बलिष्ठ राष्ट्रनिर्मितीसाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी सक्षमपणे भूमिका बजावली होती. त्यांच्या प्रेरणेनेच कारगिल युद्धात आपल्या देशाच्या सैनिकांनी शौर्य दाखवत भारत देशाची सक्षमता दाखवून दिली. त्यांच्याच कार्य कालावधीत देशभर राष्ट्रीय हमरत्यांचं जाळं विणलं गेलं आणि दळणवळणात एक वेगळी क्रांती निर्माण झाली. अशा थोर पुरुषांच्या कार्य आणि योगदानासमोर देशवासीय नेहमीच नतमस्तक असतील, असे सांगत विमल फौंडेशनचे चेअरमन किरण जाधव यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवाद केले. याप्रसंगी महेश साळुंखे, अक्षय साळवी, शिवकुमार मालकनवर, चैतन्य नंदगडकर, सोनल सपकाळ यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.