Saturday , December 14 2024
Breaking News

चुरशीच्या लढतीत ईर्षेने मतदान!

Spread the love

बोरगाव नगरपंचायतीसाठी 82 टक्के मतदान : 50 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कर्नाटक महाराष्ट्रमधील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या बोरगाव नगरपंचायतीसाठी सोमवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत मतदारांनी ईर्षेने मतदान केले. सर्वच पक्षांनी आपापल्या प्रभागातील मतदारांना ज्ञान करण्यासाठी दुचाकीसह चार चाकी वाहनांची सोय केली होती. एक एक मतासाठी उमेदवार व कार्यकर्ते अखेरच्या वेळेपर्यंत झटत होते. या निवडणुकीत 50 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. गुरुवारी (ता.30) रोजी या मतदानाचा निकाल होणार आहे.
सकाळी आठ वाजल्यापासूनच शहरातील 17 प्रभागासाठी मतदानास प्रारंभ झाला. सकाळी थंडी असूनही पहिल्या टप्प्यात 53 टक्के पेक्षा अधिक मतदान झाले होते. दुपारी 1 नंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत काही मतदान केंद्रावर नागरिकांची तुरळक गर्दी होती. मात्र वेळ संपत असल्याने उर्वरित मतदारांना म्हणून मतदान करून देण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली. अपंग आणि वयोवृद्ध मतदारांना आणण्यासाठी प्रशासनातर्फे व्हील चेअर व इतर वाहनांची सोय केली होती. शहरात काही ठिकाणी प्रभागनुसार मतदान तर शहराबाहेर शाळेच्या आवारात बहुतांश प्रभागाची मतदान यंत्रणा राबविण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर आवारात नागरिकांना बंदी घालण्यात आली होती.
मतदान केंद्राच्या परिसरात 100 मीटर आवाराबाहेर उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते थांबून मतदारांना मतदानाचे आवाहन करीत होते. तर पॅनल प्रमुख व राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी सर्वच मतदान केंद्रावर भेट देऊन मतांची चाचपणी केली. मतदान काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी त्यांच्या नेतृत्वाखाली निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी यांच्यासह 50 पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याशिवाय एसआरपीचे वाहन तैनात करण्यात आले होते.

प्रभाग एकमध्ये गर्दीचा उच्चांक
येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये 1500 मतदार आहेत. येथील जुन्या कन्नड शाळेमध्ये या प्रभागातील मतदान यंत्रणा राबविण्यात आली. येथे मोठ्या संख्येने असल्याने सकाळपासून मतदान संपेपर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्याने त्या ठिकाणी गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला.
—-
प्रभाग 15 मध्ये दुपारीच मतदान पूर्ण
येथील प्रभाग क्रमांक 15 मध्ये 527 मतदार असल्याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथील मतदान पूर्णपणे झाले होते. त्यामुळे दुपारनंतर हा परिसर निर्मनुष्य बनला होता.
—-
मतदान तुम्हालाच
मतदानाच्या पहिल्या रात्री मतदारांना सर्वच गटातर्फे रोख रकमेसह विविध प्रकारचे आमिषे दाखविण्यात आली. तरीही मतदार राजा काय करेल याची शाश्वती नसल्याने सर्वच गटाचे प्रमुख मतदान केंद्राच्या बाहेर थांबून मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यावेळी मतदारांकडून आमचे मतदान तुम्हालाच असे सांगितले जात होते.
—-
यांनी बजावला मतदानाचा हक्क
नगर पंचायत निवडणुकीत सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले, भाजपचे सुनील पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात आपले मतदान केले.

युवा मतदारांमध्ये उत्साह
बोरगाव नगर पंचायत निवडणूक स्थानिक पातळीवरील असली तरी त्यामध्ये सर्वच नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अर्धा रस्ता करून त्यामध्ये मतदानासाठी युवा वर्गामध्ये उत्साह दिसून आला. तर अनेक युवक युवतींनी प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावला.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द

Spread the love  उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *