
बेळगाव : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन त्यांना यावर्षी मतदारसंघात आणलेल्या अनुदानाबाबत प्रश्न विचारले. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी विजय कोडगनूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. आपल्या माहितीप्रमाणे मतदारसंघाच्या संदर्भात एकही विकासकामे सुरू झालेली नाहीत, आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघासाठी किती अनुदान आणले..? या सरकारच्या काळात आतापर्यंत जेवढे अनुदान जाहीर झाले आहे.. तेवढेच अनुदान शेतातील नापिकीच्या जबड्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिले आहे का? असे आमदार राजू सेठ यांना विचारले.भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करताना आमदार राजू सेठ म्हणाले की, गेल्या भाजप सरकारच्या काळात किती अनुदान जाहीर झाले, स्मार्ट सिटीमध्ये 980 कोटींचे अनुदान जाहीर झाले, त्यापैकी केवळ मागील सरकारमध्ये 30 टक्के कामे झाली. ते म्हणाले की, काँग्रेसचे सरकार आल्यावर राज्यात जनतेच्या हिताचा कारभार सुरु आहे. काँग्रेसने राज्यातील जनतेसाठी हमी योजना राबवल्या, महिलांसाठी मोफत बस, 5 किलो तांदूळ आणि 170 रुपये प्रतिव्यक्ती या अंतर्गत अन्नभाग्य योजना राबवल्या आहेत.
भाजप उत्तरचे अध्यक्ष विजय कोडगनूर म्हणाले की, आमदार राजू सेठ यांची एक वर्षापासून सत्ता असून, उत्तर मतदारसंघात काही विकासकामे होत असतील तर रस्त्याच्या पाण्याची समस्या आहे, त्यामध्ये आमदार राजू सेठ यांनी केलेल्या कामांची लेखी माहिती द्यावी.
यावेळी शहर भाजप अध्यक्षा गीता सुतार, अशोक थोरवत, शरद पाटील, शिल्पा केकरे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta