बेळगाव : भारतीय थ्रोबॉल फेडरेशनशी संलग्न असलेल्या कर्नाटक राज्य थ्रोबॉल असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत डॉ. अमित एस. जडे आणि अनिल जनगौडा हे उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता ते कर्नाटक थ्रोबॉल असोसिएशनचे पात्र राज्यस्तरीय पंच आहेत.
भारतीय थ्रोबॉल फेडरेशनशी संलग्न असलेल्या कर्नाटक राज्य थ्रोबॉल असोसिएशनद्वारे काल रविवारी 11 फेब्रुवारी रोजी धारवाड येथे पंच परीक्षा घेण्यात आली. कर्नाटक राज्य बेरोजगार शारीरिक शिक्षण शिक्षक संघ धारवाड यांनी कर्नाटक राज्य थ्रोबॉल असोसिएशन चिक्कबळ्ळापुर यांच्या सहकार्याने ही परीक्षा झाली. पंच परीक्षेचे पर्यवेक्षण सुनील गोला (राज्य अध्यक्ष), महांतेश डी. एच (राज्य सचिव), श्रीनिवास आणि रघुनारायण (राष्ट्रीय थ्रोबॉल खेळाडू) यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
डॉ. अमित जडे हे केएलएस गोगटे पीयू महाविद्यालय, बेळगाव येथे शारीरिक प्रशिक्षक म्हणून काम करतात. तसेच अनिल जनगौडा हे गोमटेश पीयू महाविद्यालयात शारीरिक शिक्षणाचे व्याख्याते म्हणून काम करतात. पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल या उभयतांचे शारीरिक शिक्षण विभाग, थ्रोबॉल खेळाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंकडून अभिनंदन होत आहे. डॉ. जडे आणि जनगौडा यांना आता असोसिएशन, फेडरेशन, दसरा, एसजीएफआय, तालुका, जिल्हा आणि राज्य थ्रोबॉल स्पर्धांचे संचालन करण्यासाठी प्रामाणिक रेफ्री परवाना मिळाला आहे. या पद्धतीने हे दोघेही बेळगांवचे पहिले गुणवंत पंच ठरल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.