Saturday , March 7 2026
Breaking News

गोकुळने सीमाभागातील दूध दर पूर्ववत करावेत : युवा समितीची मागणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव, निपाणी भागातील बहुतांश दूध उत्पादक शेतकरी गोकुळला (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) दूध पुरवठा करतात पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सीमाभागातील म्हैशीच्या व गाईच्या खरेदी दरात कपात केली आहे, आदीच पशुखाद्य व वैरणीचे दर भरमसाठ वाढले असताना फक्त सीमाभागातील दूध दर कमी करणे हा सीमाभागातील शेतकऱ्यावर अन्याय असून या निर्णयामध्ये सीमाभागातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, तरी जसे महाराष्ट्र शासन नेहमी सीमाभागातील जनतेला महाराष्ट्रीयन समजते तशीच वागणूक देवून कोल्हापूरप्रमाणे सीमाभागातील शेतकऱ्यांना सुद्धा खरेदी दर द्यावा अशी मागणी सीमाभागातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना पत्र पाठवून केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *