Wednesday , March 4 2026
Breaking News

महापालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयात चोरी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील बसवेश्वर सर्कलजवळील बेळगाव महापालिकेच्या दक्षिण विभागाच्या महसूल शाखेत चोरी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
महापालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला व लॅपटॉप चोरून पलायन केले. त्यांनी मालमत्ता मालकीचे कागदपत्र, मालमत्ता मालकाचे ओळखपत्र, कर प्रमाणपत्र, बांधकाम परवाना यासह २६ वॉर्डातील रहिवाशांच्या नोंदी असलेले तीन लॅपटॉप चोरले आहेत. सोमवारी सकाळी कर्मचारी कार्यालयात आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
टिळकवाडी पोलीस व श्वान पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महापालिकेचे आयुक्त पी. एन. लोकेश म्हणाले की, चोरीचा एफआयआर यापूर्वीच नोंदवण्यात आला असून पोलीस तपासात चोरीची संपूर्ण माहिती समोर आली आहे. महापालिका महसूल अधिकारी डी. जे. कोरी यांनी सांगितले की, काल शासकीय सुट्टीचा दिवस होता आणि सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले. खिडकीच्या मागील काचा फोडून तीन लॅपटॉप चोरले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *