बेळगाव (वार्ता) : नववर्ष स्वागताच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या रात्री होणारे गैरप्रकार थांबविण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
नववर्ष स्वागताच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या रात्री युवावर्ग मद्यपान, धूम्रपान अशा अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार वाढत आहेत. पाश्चात्यांचे अंधानुकरण करत असे गैरप्रकार करण्यात येत आहेत. अनेक लहान वयाचे तरुण-तरुणी यात सहभागी होत आहेत.
परिणामी महिलांच्या सुरक्षेला आणि कायदा व सुव्यवस्थेलाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे हे गैरप्रकार थांबवावेत अशी मागणी हिंदू जनजागृती संघटनेच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांना जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
या संदर्भात बोलताना उज्ज्वला गावडे म्हणाल्या, 31 डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागताच्या नावाखाली युवकांकडून अनेक गैरप्रकार केले जात आहेत. मद्य प्राशन करून गाणी लावून हिडीस नृत्य करणे आदी प्रकार केले जातात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेला आणि कायदा व सुव्यवस्थेलाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे हे गैरप्रकार थांबवावेत अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सुधीर हेरेकर, वेंकटेश शिंदे, बाळू कुरुबर, सदानंद मासेकर, विनोद पाटील, नागेंद्र अष्टेकर आदी उपस्थित होते.
