
बेळगाव : टीव्ही9 मराठी वाहिनीचा प्रमुख असल्याचे सांगून बेळगाव जिल्ह्यातील विविध भागात ब्लॅकमेल करणाऱ्या एका बनावट पत्रकाराला मंगळवारी बेळगावात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
रमजान मुजावर नावाचा व्यक्ती अथणी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात मी टिव्ही9 या मराठी वाहिनीचा महाराष्ट्र पश्चिम विभागाचा प्रमुख आहे, असे सांगून लोकांना ब्लॅकमेल करत होता.
ही बाब टिव्ही9 कन्नड वाहिनीचे बेळगाव जिल्हा प्रतिनिधी सहदेव माने यांच्या लक्षात येताच त्यांनी शहरातील साहित्य भवन येथे आरोपीला हटकले. त्यानंतर शहर पोलीस आयुक्तांना माहिती देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपी विरोधात मार्केट पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta