बेळगाव (वार्ता) : गेल्या 55 वर्षांपासून प्रथा खंडित होऊ नये याकरिता येथील नार्वेकर गल्लीतील भक्त मंडळाच्या वतीने गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही जोतिबा मूर्तीची गाठ भेट करण्याकरिता वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर डोंगराकडे प्रस्थान करण्यात आले आहे. आज सकाळी मंदिरातील भाविकांच्या वतीने देवाची गाठभेट करण्याकरिता भाविकांनी प्रस्थान केले.
चैत्र पौर्णिमेला दरवर्षी जोतिबाचा उत्सव साजरा करण्याकरिता बेळगाव येथून जोतिबा भक्त मंडळाच्या वतीने पायी वारी करण्यात येते. गेल्या 55 वर्षांपासून ही प्रथा अद्यापही चालू आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने चैत्र वारीची प्रथा खंडित होऊ नये याकरिता वर्षाअखेरीस देवाची गाठीभेटी करुन परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
ज्याप्रमाणे दरवर्षी चैत्र पौर्णिमेची धार्मिक विधी करण्यात येते त्याच प्रकारची धार्मिक विधी आज म्हणजे सोमवारी करण्यात आली. यावेळी येथील पंचगंगा नदीवर स्नान करून जोतिबा देवाला अभिषेक घालून नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रदक्षिणा घालून वाडी रत्नागिरी येथील गायमुखाकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. तसेच गायमुखाकडे पुन्हा देवाला अभिषेक करण्यात येणार असून तेथून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात गायमुखापासून ते जोतिबा मंदिरापर्यंत पायी वारी करण्यात येणार आहे.
त्यानंतर मंदिरात देवाची गाठ भेट करून सर्व धार्मिक विधी, पूजा पार पाडण्यात येणार आहे. तसेच मानाचे विडे देऊन ज्योतिबाची मुर्ती घेऊन भक्तमंडळी बेळगावकडे मार्गस्थ होणार आहेत.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …