बेळगाव- बेळगावची होतकरू जलतरणपटू अनुमती अनिल चौगुले हिने गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.
खेलो इंडिया ही राष्ट्रीय स्तरावरची जलतरण स्पर्धा गुवाहाटी येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत बेंगलोरच्या जैन विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुमती चौगुले हिने दोन सुवर्णपदकासह एक कास्य पदक हस्तगत केले. बेळगावात शालेय शिक्षण पूर्ण केलेली अनुमती सध्या बेंगलोर येथील जैन विद्यापीठात शिकत असून बसवनगुडी येथील एक्वेटिक सेंटरमध्ये जलतरण प्रशिक्षण घेत आहे. तिला प्रशिक्षक नटराज आणि आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभत असून तिने पूर्वी बेळगावच्या स्विमर्स क्लब मध्येही प्रशिक्षण घेतले आहे.