Saturday , July 27 2024
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन….

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 27 फेब्रुवारी, कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या प्रांगणात सायंकाळी 5.00 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.. यावर्षी प्रबोधिनीतर्फे साजरा केला जाणारा हा 25 वा मराठी भाषा गौरव दिवस आहे. या निमित्ताने कोल्हापूर येथील बाल शिक्षण तज्ज्ञ सुचिता पडळकर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर या कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगाव येथील प्रसिद्ध अभियंता श्री. शिवाजी अतिवाडकर यांच्या हस्ते केले जाणार आहे.
गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ समाजसेवक व मार्गदर्शक शिवाजीदादा कागणीकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट प्राप्त झाली म्हणून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांना यावर्षी राणी चनम्मा विद्यापीठातर्फे मराठी विषयाची डॉक्टरेट प्राप्त झाली आहे त्यांचा व बेळगाव मधिल नवोदित कवयित्री म्हणून नावाजत असलेल्या हर्षदा सुंठणकर यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.. तसेच मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेतील नवोदित शिक्षक कवी श्री. गजानन सावंत, श्री. बी. जी. पाटील, सौ. मंजुषा पाटील, सौ. सीमा कंग्राळकर, सौ. स्नेहल पोटे व नवोदित बाल कवी कु. प्रसाद मोळेराखी, कु प्रथमेश चांदिलकर, कु परम भावकू पाटील, कु रावी कोटबागे, कु श्रेया घोळसे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मराठी प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.

सुचिता पडळकर यांचा परिचय

सुचिता पडळकर मुळच्या कोल्हापूर येथील रहिवासी असून गेली तीस वर्षे बाल शिक्षणामध्ये कार्यरत आहेत. सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर या प्रयोगशील शाळेच्या त्या संचालिका असून बुनियादी शिक्षण केंद्र या शिक्षण संस्थेच्या सचिव आहेत. ‘शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी’ हे त्यांचे बाल शिक्षणातील विविध प्रयोगांविषयी लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांचा ल. ग. गद्रे शैक्षणिक पुरस्कार व आचार्यकुल नागपूर यांचा मातृभूमी पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. ‘समता योद्धा साने गुरुजी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. बाल शिक्षणातील विविध प्रयोग, बालवाडी शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, नर्मदा जीवन शाळा शिक्षकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक कामाविषयी लेखन व गांधी विनोबा विचारांचा प्रचार व प्रसार अशी अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सुचिता पडळकर या साठे प्रबोधिनीच्या मराठी भाषा दिन कार्यक्रमात ‘माय मराठी’साठी या विषयावरती आपले विचार मांडणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *