Sunday , July 26 2026
Breaking News

कारागृह अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ श्रीराम सेनेचे आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त हिंडलगा कारागृहासमोर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यास मज्जाव करणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ श्रीराम सेना बेळगावच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.

दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज 26 फेब्रुवारी रोजी श्री राम सेना प्रमुख तसेच कार्यकर्ते हिंडलगा कारागृह समोर वीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी गेले होते. मात्र तेथील जेलरनी पूजनास विरोध करून कार्यकर्त्यांना हाकलून लावले. त्यावेळी गेली कित्येक वर्षे श्री राम सेना बेळगावचे कार्यकर्ते हा पूजनाचा कार्यक्रम करत असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली. तरी देखील ‘आता सरकार बदलले आहे तुम्ही पूजा करायची नाही’, असे दरडावत कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी खालच्या पातळीचे शब्दप्रयोग करत कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या पोलिस अधिकाऱ्याचा धिक्कार करत कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर कारागृहा समोरील रस्त्यावर स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्री राम सेना बेळगावचे नेते रविकुमार कोकितकर आणि भाजप ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *