Wednesday , December 10 2025
Breaking News

कन्नडसक्ती विरोधात महाराष्ट्र सरकारकडे समितीची तक्रार!

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारने व्यवसाय करणाऱ्या दुकानावरील फलकावर 60% कन्नड लिहिणे सक्तीचे केले आहे. याबाबत बेळगाव महानगरपालिका आपल्या अधिकाऱ्यांना आस्थापनाकडे पाठवून दडपशाहीचे धोरण अवलंबित आहे. बेळगावमधील बहुतेक भागात फलक मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत आहेत परंतु बेळगाववर कन्नडचे प्राबल्य दाखविण्याकरता कर्नाटक सरकारने काही कन्नड संघटनांना हाताशी धरून मराठी माणसांना  डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महानगरपालिकेच्या या दडपशाही आणि दादागिरी विरुद्ध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि सीमा समन्वयक मंत्री श्री. शंभूराजे देसाई यांना पत्र पाठवून मराठी माणसाविरुद्ध चाललेल्या या कृत्यासंदर्भात माहिती दिली आहे. नुकतेच श्री. शिंदे साहेब आणि श्री. शंभूराजे देसाई यांच्याबरोबर समितीच्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी लवकरात लवकर आपण कर्नाटक सरकारची संपर्क करीत आहोत असे उत्तर दिले गेले होते. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आपल्या मंत्री गटाच्या बैठकीत नागरिकांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्याचे आदेश दिले होते परंतु याकडे दुर्लक्ष करून सरकार दडपशाही करत आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सीमावासियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशा प्रकारची विनंती ही समितीने पत्राद्वारे केली आहे. या पत्रावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी, कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर, सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांच्या सह्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *