बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरात आज राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या जन्मदिनाचे आचरण करण्यात आले होतेबेळगावच्या बसवराज कट्टीमनी सभागृहात जिल्हाप्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका तसेच कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येणार विश्वमानव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्याहस्ते करण्यात आले. राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बेळगावचे एसी करलिंगन्नावर यांनी कुवेम्पू यांनी दिलेल्या संदेशाबद्दल माहिती दिली. राष्ट्रकवी कुवेम्पू यांचे साहित्य उत्कृष्ट दर्जाचे आणि अभिजात संस्कृतीचे दर्शन घडविणारे होते, असे सांगितले.
या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी शंकराप्पा वनक्याळ, एसी करलिंगन्नावर, निर्मल बट्टल, सुनीता देसाई तसेच कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या संचालिका विद्यावती भजंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
