Saturday , July 27 2024
Breaking News

कर्नाटकात पेट्रोल 10 तर डिझेल 8 रुपयांनी स्वस्त!

Spread the love

सीमाभागातील 20 पेट्रोलपंप चालक अडचणीत : निपाणी, कोगनोळीत खरेदीसाठी गर्दी
निपाणी (वार्ता) : पेट्रोल, डिझेल दरवाढीने वाहनधारकांबरोबरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे दर वाढल्याने त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनीही व्यावसायातील वस्तूंच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकर्‍यांवर आर्थिक भार वाढला आहे. दरम्यान कर्नाटकात पेट्रोल जवळपास 10 रुपये तर डिझेल 8 रुपये प्रतिलिटर कमी असल्याने कागल, हुपरी, इचलकरंजी गडिंग्लज, सेनापती कापशी, हमिदवाडा, खडकेवाडा, लिंगनूर व परिसरातील वाहनधारक शेजारच्या कर्नाटकातील निपाणी, कोगनोळी, मांगुर, बोरगाव, संकेश्वर येथील पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करत आहेत. त्यामुळे सीमाभागातील महाराष्ट्रामधील 20 पेक्षा अधिक पेट्रोल पंप चालकांचा व्यवसाय मंदावला आहे.
कागल तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने साधारणत: 10 ते 15 किलोमीटर अंतराच्या फरकावर कर्नाटक राज्यातील पेट्रोल पंप आहेत. तेथे पेट्रोलचा दर शंभर रुपये 100 पैसे प्रतिलिटर आहे. तर कागल, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यातील 110 रुपये 49 पैसे आहे. म्हणजे लिटरमागे 9 रुपये 57 पैसे कमी दर आहे. कर्नाटकात डिझेलचा दर 85 रुपयेदोन पैसे प्रतिलिटर आहे. तर हाच दर महाराष्ट्रात 93 रुपये 27 पैसे लिटर आहे. म्हणजे लिटरमागे 7 रुपये 93 पैसे कमी दर आहे. त्यामुळे ट्रक व इतर मालवाहतूक व्यावसायिक कर्नाटकातून डिझेल खरेदी करत आहेत. साधारणत: चारशे लिटर क्षमतेची टाकी कर्नाटकातील पंपावर भरली तर जवळपास 3 हजार 200 रुपयांची बचत होत आहे.
कर्नाटकात काही कामानिमित्त गेलेले आणि आवर्जून जाणारे दुचाकीचालक पेट्रोलची टाकी फुल्ल करत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गसह महाराष्ट्रातील जवळपास 20 पेट्रोल पंपधारकांचा व्यवसाय मंदावला आहे.
—-
तर इंधनाची तस्करी वाढेल!
महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरातील मोठ्या तफावतीमुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने विविध साहित्याच्या दरवाढीचा बोजा सर्वसामान्यांना बसत आहे. कर्नाटकात पेट्रोलचा दर जवळपास दहा रुपयांनी कमी असल्याने तेथून साठा उपलब्ध करून तो येथे चार- पाच रुपये आगाऊ रक्कम घेऊन विक्री करण्याचे प्रकार काही ठिकाणी सुरू आहेत. अनेक व्यावसायिक वाहनांसाठी डिझेलचा स्टॉक करून ठेवत आहेत. येणार्‍या काळात अशीच स्थिती राहिली तर इंधनाची तस्करी आणखी वाढू शकते.

’नोटबंदी आणि जीएसटीमुळे ट्रक व्यवसायावर आर्थिक मंदीचे सावट आले होते. त्यात पुन्हा कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. डिझेलच्या दरवाढीने तर व्यवसायाला चाळणी लागत आहे. भाडे परवडत नाहीत. शेजारील कर्नाटक राज्यात लिटरमागे आठ ते साडेसाठ रुपये दर कमी असल्याने तेथे डिझेलची खरेदी केली जात आहे.’
– चंद्रशेखर पवार, ट्रक व्यावसायिक, हमिदवाडा (ता. कागल)

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

Spread the love  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *