बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन, सामान्य ज्ञान स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा तसेच आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने ‘मराठी भाषेचा विकास – माझी जबाबदारी या विषयावर प्रा. आनंद मेणसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ खानापूर रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.