
येळ्ळूर : नवहिंद क्रीडा केंद्र येळलूर संचालित नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा सौ. नम्रता आनंद पाटील या होत्या. सामुदायिक विश्व प्रार्थनेने कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटीच्या व्हा. चेअरमन सौ. सुरेखा सायनेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाच्या सेक्रेटरी सौ. संध्या सुंदरे यांनी केले.
महिलानी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल न म्हणता त्यांनी स्वताकडेही लक्ष देवून दरवर्षी आपल्या शारिरीक चाचण्या करून घेतल्या पाहिजेत, असे विचार माजी अध्यक्षा सौ. शुभांगी पाटील यांनी मांडले.
अध्यशिय भाषणात सौ. नम्रता पाटील यांनी वेळेचे महत्व पटवून दिले. यावेळी उपस्थित महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या, यावेळी सुलभा पाटील, रेखा ह. पाटील, हिरा कुंडेकर,जयश्री देसूरकर, सुनिता कणबरकर, नथन उघाडे, स्वाती पाटील, रेखा य. पाटील, राजश्री दणकारे, पूजा कंग्राळकर, प्रगती पाटील, शिला पाटील, शिंपल कुगजी, पल्लवी जाधव, शितल बस्तवाडकर वैशाली मजुकर, वंदना कदम या संघाच्या महिला उपस्थित होत्या. सौ. शारदा मुरकुटे यांच्या उभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta