Wednesday , March 4 2026
Breaking News

काळेनट्टी गावात टाकी बसवून केली पाण्याची सोय!

Spread the love

 

बेळगाव : सध्याच्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे (एफएफसी) पोतदार ज्वेलर्सच्या सहकार्याने काळेनट्टी गावामध्ये 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवून गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय करून देण्याचा प्रकल्प राबवण्यात आला. एफएफसीचा या उन्हाळी मोसमातील या पद्धतीचा हा पहिलाच प्रकल्प आहे.
काळेनट्टी (ता. बेळगाव) गावातील लोकांना विशेष करून महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत एफएफसीने गावात 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवण्याबरोबरच जवळच्या कुपनलिकेच्या माध्यमातून टाकीमध्ये पाणीपुरवठ्याची सोय करून दिली. सदर उपक्रम पोतदार ज्वेलर्सचे अनिल पोतदार यांनी पुरस्कृत केला आहे. त्याचप्रमाणे कुपनलिकेपासून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन घालण्याचे काम प्लंबर सुरेश कांबळे यांनी विनामूल्य करून दिले. काळेनट्टी गावात बसवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला पुरेशा नळांची सोय असून काल मंगळवारी सायंकाळी सदर टाकीचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, रेखा नायडू, राहुल पाटील, पद्मप्रसाद हुली, अवधूत तुडवेकर, गौतम श्रॉफ, श्रीधर पडनवर, किरण होसकोटी, सुरेश कांबळे, आकाश केलूर, लक्ष्मण होसकोटी, सिद्धार्थ शिर्के आदींसह गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *