बेळगाव (वार्ता) : रेल्वे प्रशासनाच्या विविध कामांच्या निमित्ताने टिळकवाडी येथील फर्स्ट रेल्वेगेट चार दिवस बंद राहणार आहे. रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर 383 अशी या गेटची ओळख असून दिनांक चार जानेवारी ते सात जानेवारी या काळात रेल्वे गेट बंद राहणार आहे.
दिनांक 4 जानेवारीच्या सकाळी नऊ वाजल्यापासून सात जानेवारीच्या रात्री अकरा वाजेपर्यंत हे गेट बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
