बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी बेळगाव पोलीस सज्ज झाले आहेत. सीसीबी पोलिसांनी लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे छापा टाकून 10 लाखांची अवैध दारू, कार जप्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी बेळगाव पोलीस सज्ज झाले आहेत. बेळगाव पोलिसांकडून अवैध दारू विक्री, भेटवस्तूंचे वाटप रोखण्यासाठो पावले उचलण्यात येत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून सीसीबी पोलिसांनी सराईत दारू विक्रेत्याला अटक करून दहा लाखांची अवैध दारू व कार जप्त केली. या प्रकरणी 41 वर्षीय राजेश केशव नायक, राहणार : हिंडलगा, बेळगाव याला अटक करण्यात आली.दिनांक 28/03/2024 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव शहराजवळील लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे सार्वजनिक ठिकाणी छापा टाकला आणि राजेश नायक याला अटक केली. तो गोव्याहून आणलेल्या अवैध दारूची वाहतूक व विक्री करत होता. त्याच्या कारमध्ये गोवा राज्यातील विविध कंपन्यांच्या 186.5 लिटरच्या अंदाजे 9,09,750/- किमतीच्या अवैध दारूच्या बाटल्या आढळल्या. त्या तसेचगुन्ह्यात वापरलेली सुमारे 1,50,000/- किंमतीची कार आणि 350 रोख रक्कम अशा प्रकारे एकूण 10,60,100/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बीनांग, डीसीपी रोहन जगदीश व स्नेहा पीव्ही यांनी या कारवाईत सहभागी झालेल्या सीसीबी पथकाचे निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.