५२ रुग्णांवर उपचार, त्यात २१ नव्या रुग्णांची भर
बेळगाव : कोरोनाचे संकट कायम असतानाच जिल्ह्यात हत्ती रोगाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात यापूर्वी हत्ती रोगाची लागण झालेल्या ५२ रुग्णांवर उपचार सुरू असतानाच पुन्हा २१ नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य खात्याची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे सर्व बाधित रुग्ण हे रामदुर्ग तालुक्यातील आहेत.
उत्तर कर्नाटकातील सीमावर्ती जिल्ह्यात हत्ती रोगाची लागण झालेले रुग्ण आढळून येते आहेत. बागलकोट, जमखंडी, विजापूर, रायचूर या जिल्ह्यात रुग्ण आढळून येते आहेत. या बाधित जिल्ह्यामध्ये जाऊन आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील लोकांना हा रोग झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तशा रुग्णांवर आरोग्य खात्याने लक्ष ठेवले आहे. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
रोगाची लक्षणे
डासाने चावा घेतल्यास हत्ती रोगाची लागण होते. वारंवार ताप येणे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. “मायक्रोपैलेरिया” या डासाने चावा घेतल्यास या रोगाची बाधा होऊन पायांना सूज येते. डासाने चावा घेतल्यानंतर ६ महिन्यात रोगाचे निदान होते. त्यामुळे रुग्णांना असह्य वेदना होतात. यामुळे अपंगत्व येण्याचा धोका देखील असतो.
—————————————————–
जिल्ह्यातील हत्ती रोग नियंत्रनात आणण्यासाठी उपाय योजना सुरू आहेत. रोगाचे निदान झालेल्या झालेल्यावर औषध उपचार केले जात आहेत. पर राज्यात जाऊन आलेल्यानी रक्त तपासणी करून घेतले पाहिजे. लवकरच यावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल.
डॉ. एम. एस. पल्लेद
जिल्हा रुग्ण नियंत्रण अधिकारी.