
बेळगाव : बेळगावसह उपनगरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. मागील दोन दिवसात शहर व परिसरात तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज वळीवाने संपूर्ण शहराला झोडपून काढले आहे. मागील काही दिवसात उष्माघाताने हैराण झालेल्या बेळगावकरांनी गारवा अनुभवला आहे.
आज सायंकाळी ४.३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावरील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पावसामुळे राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचारही खोळंबला असून सुमारे अर्ध्या तासापासून पाऊस जोरदार सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta