बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील तिम्मापुर गावाजवळ ब्रेक निकामी झाल्याने राजहंस बस उलटली.
हुबळीहून बेळगावकडे येणारी राजहंस बस सर्व्हिस रोडवर रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेडवर उलटली. बसमधील दहाहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून वीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.