Saturday , July 27 2024
Breaking News

शिवाजी माने यांचा हातकणंगलेतून लोकसभेसाठी अर्ज दाखल

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : जय शिवराय किसान संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना जिद्द बांधकाम कामगार संघटना, बळीराजा पार्टी, विश्वकर्मा पांचाळ समाज संघटना या संघटनांतर्फे जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांचा लोकसभेसाठी हातकणंगलेतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, देशातील जनता घराणेशाही व सध्याच्या राजकारणाला कंटाळली आहे. ही घराणेशाही नष्ट करण्यासाठी, शेतकरी चळवळीतील खणखणीत नाणे शिवाजी माने यांचा अर्ज भरत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवाजी माने यांना निवडणून आणणे आवश्यक असल्याचे सांगितले
यावेळी बाळासाहेब रास्ते, राजेंद्र सुतार, शामसुंदर जायगुडे, दत्ता गोते, सदाशिव कुलकर्णी, बाळकृष्ण पाटील, अविनाश पाटील, उदय पाटील, बंडा पाटील, गब्बर पाटील, शितल कांबळे, महेश मोहिते, नानासो इंगळे यांच्यासह हातकणंगले मतदार संघातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

Spread the love  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *