गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने “त्या” तथाकथित बँकेच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वाचली. आत्ता आणखीन एक किळसवाणा प्रकार सध्या चर्चिला जात आहे. मुळात बेकायदेशीरपणे निवड केलेला हा जनरल मॅनेजर अध्यक्षांच्या नात्यातला आहे. आणि या नात्यातील माणसाला नोकरी बहाल करण्यासाठी त्यांनी आधीच्या मॅनेजरला त्रास देवून राजीनामा देण्यास भाग पाडले.
अध्यक्ष आणि या जनरल मॅनेजरने बँकेच्या व्यवहारात घोटाळे करून बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे. या एकंदर प्रकारात आत्तापर्यंत कश्याप्रकारे कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली, महिला सहकाऱ्याला कसा त्रास दिला हे समजले असेल पण त्याहून भयंकर असा एक प्रकार समोर आला आहे.
मॅनेजरने बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याला नको तो त्रास दिला असल्याने त्या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय बँकेत येऊन जाब विचारताच त्या मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिली. या सगळ्या प्रकरणात पोळी भाजून घेतली ती एका विद्यमान संचालक व माजी नगरसेवकाने. एवढं होऊन सुद्धा या जनरल मॅनेजरचे प्रताप काही कमी होत नाहीत. काम संपल्यावर रात्री उशिरापर्यंत मदिरापानचा अस्वाद घेणे हे सर्व प्रकार करत होते.
बँकेचे अध्यक्ष तर माणुसकी सुद्धा विसरलेले आहेत. आपल्याच शेजारी राहणाऱ्या व त्याच बँकेत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा गेल्या तीन वर्षापासून मानसिक छळ देत आहे. त्या महिला कर्मचाऱ्याला उशिरापर्यंत बँकेत काम करायला लावायचे. असेच एक दिवस कामाच्या तानाने ती महिला बँकेत भोवळ येवून पडली. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्रकरण अंगाशी येवू नये म्हणून त्या अध्यक्षाने त्या महिलेची लांबच्या शाखेत बदली केली व तिचे त्रास कमी करण्याऐवजी आणखीन वाढविले. यापुढे तरी या बँकेच्या अध्यक्ष व मॅनेजरने सभासद, कर्मचाऱ्यांशी माणुसकीने वागले पाहिजे इतकीच आशा व्यक्त करू शकतात.
“त्या” बँकेत कर्जासाठी “एजंट” राज फोफावला आहे. (क्रमशः)