बेळगाव : खासबाग येथील टीचर्स कॉलनीमधील मत्तीकोप विहीर ही ब्रिटिशकालीन 150 वर्षे जुनी असुन जिथे संपूर्ण टिळकवाडी, शहापूर आणि खासबाग मधील नागरिक पोहायला शिकले होते, 60 वर्षा पूर्वी या विहिरीकडे दुर्लक्ष झाले आणि कालांतराने ती मुजून गेली व तिचे वैशिष्ट्य गमावले.
प्यास फाउंडेशन, ए के पी फेरोकास्ट आणि बेम्को यांच्या वतीने या विहिरीस पुनर्जीवन देण्याचे काम हाती घेण्यात आले, जवळजवळ तीस फूट खोली असलेल्या निळ्या पाण्याची ही विहीर, कमालीच्या उन्हाळ्यात ही काठोकाठ भरलेली असते. ही विहीर दररोज अंदाजे 1000 टँकर पाणी पुरवू शकते आणि ती कोरडी पडणार नाही, हीच शहरासाठी निर्माण झालेली संपत्ती आहे. आता ही विहीर बांधून लवकर तिच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात येणार आहे.