बेळगाव : बेळगाव शहरातील खानापूर रोड वरील गोवावेस जवळ असलेल्या दत्त मंदिरच्या बाजूला असणाऱ्या पेट्रोल पंपवर आज भीषण आग लागली होती. बंद असलेल्या पेट्रोल पंपवरील बाजूच्या शेडला ही आग लागली असून अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या व त्यांनी आग आटोक्यात आणली.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वर्दळीच्या ठिकाणी सदर पेट्रोल पंप हा बंद अवस्थेत असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे. यासंबंधी अधिक तपास सुरू आहे.