बेळगाव : फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे बेळगाव येथील महावीर गोशाळेत गायींना चारा वाटप करण्यात आला. बेळगावातील महावीर गोशाळेत दीडशेहून अधिक गायी आहेत. दुष्काळामुळे अनेक ठिकाणी जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. याची गांभीर्याने दखल घेत फेसबुक मित्र मंडळाने 11 पोती चारा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी संतोष दरेकर, विनायक एल. चंद्रकांत खानोलकर, अवधूत तुडयेकर, सौरभ सावंत, स्वयं पाटील, रोहित रणसुबे आदींचा सहभाग होता.