Monday , June 17 2024
Breaking News

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; तालुका म. ए. समितीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : १ जून रोजी सकाळी ८.३० वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात कन्नडसक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे ठरले. तर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी ४ जून नंतर व्यापक बैठक घेण्याचा निर्णयही रविवारी (दि. २६) मराठा मंदीर सभागृहात झालेल्या बैठकीत आला.

१९८६ मध्ये कर्नाटक सरकारने कन्नडसक्ती लागू केली. या आंदोलनात सातजणांना हौतात्म्य आले. त्या हुतात्म्यांना १ जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात येणार आहे. या अभिवादन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला संघटनात्मक बळ देण्यासाठी ४ जूननंतर व्यापक बैठक घेण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.

बैठकीला कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, मनोज पावशे, रामचंद्र मोदगेकर, आर. के. पाटील, एल. एस. होनगेकर, डी- बी. पाटील, नारायण कालकुंद्री, मनोहर संताजी, एल. आर. मासेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मर्कंटाईल सोसायटीला जॉईंट रजिस्ट्रार यांची भेट

Spread the love  बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *