Friday , November 6 2026
Breaking News

पाण्याच्या टाकीत पडून अडीच वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : खेळता खेळता अनावधानाने घरासमोरच्या पाण्याच्या टाकीत पडून अडीच वर्षाच्या बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. साईशा संदीप बडवाण्णाचे (रा. कंग्राळ गल्ली) असे मृत बालिकेचे नाव आहे. रविवारी सायंकाळी कंग्राळ गल्ली येथे ही घटना उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, रविवारी नळाला पाणी आले होते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी घरासमोरच्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडण्यात आले होते. पाणी भरल्यानंतर ते झाकण तसेच उघडे राहिले होते. दुपारच्या वेळी साईशा घरासमोर खेळत होती. खेळता खेळता ती या पाण्याच्या टाकीत पडली. बराच वेळ घरच्यांचे याकडे लक्ष गेले नाही.

काही वेळाने साईशा घरात दिसेना असे लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. घरातील कुणाचे तरी पाण्याच्या टाकीकडे लक्ष गेले. टाकीत शोध घेतला असता साईशाचा टाकीत दुर्दैवी अंत झाल्याचे लक्षात आले.

घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आला. रात्री उशिरा या घटनेची खडेबाजार पोलिसांत नोंद झाली. पोलीस निरीक्षक राघवेंद्र बी. तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *