Friday , December 27 2024
Breaking News

३१ मे पासून होणार नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार असल्याने सर्व शाळांचे आवार शुक्रवारपासून (दि. ३१) गजबजणार आहेत. सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके १ जूनपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जाणार असून गणवेशाचे कापड १५ जूननंतर दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली.

शाळा ३१ मे रोजी सुरू होणार असल्या तरी शिक्षकांना २९ मे रोजी शाळेत दाखल व्हावे लागणार आहे. वर्ग व शाळेची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, माध्यान्ह आहाराची तयारी, शाळा प्रारंभोत्सवानिमित्त प्रभातफेरी याचे नियोजन करावे लागणार आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालकांना माध्यान्ह आहार दिला जाणार आहे. पहिल्या दिवशी मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाची उजळणी घेऊनच पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी १ ते ३० जून या काळात सेतूबंध कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. शाळा परिसरात ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त रोपलागवड करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना केल्या आहेत.

सर्व शिक्षकांनी दोन दिवस आधीच शाळेत दाखल होऊन प्रारंभोत्सवाची तयारी करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना आहेत. केल्या गटशिक्षणाधिकारीही शाळांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी करणार आहेत.

२९ व ३० रोजी शिक्षकांनी स्वच्छता करण्यासह एसडीएमसीची बैठक घ्यायची आहे. वर्षभराचा आराखडा तयार करुन वेळापत्रक तयार करावे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्या घरी भेट द्यावी. शाळेची आकर्षक सजावट करावी, अशा सूचना करण्यात आली आहे. शाळांना १ जूनपूर्वी टप्प्याटप्प्याने पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. गणवेशाच्या कापडासाठी निविदा निघाल्या असून प्रक्रिया संपताच कापड मिळणार आहे. त्यासाठी १५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतन स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे स्नेहसंमेलन 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *