बेळगाव : वडगाव अन्नपूर्णेश्वरीनगर येथील श्री अन्नपूर्णेश्वरी देवीचा ११ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. २९ पासून सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवार दि. २९ रोजी पहाटे ६ वाजता अन्नपूर्णेश्वरी देवी आणि मंदिर परिसरातील देवतांना कलषाभिषेक सकाळी ८ वाजता नागदेवतेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना व महापूजा, दुपारी १२ वाजता महापूजा, प्रसन्न पूजा व प्रसाद, सायंकाळी ५ वाजता श्री अन्नपूर्णेश्वरी देवीचा पालखी महोत्सव, रंग व दीपोत्सव होणार आहे.
गुरुवार दि. ३० रोजी सकाळी ७ वाजता विशेष अलंकार पूजा, श्री सुब्रह्मम देवा आश्लेषा बळी, सकाळी ८.३० वाजता महाचंडिका याग, सायंकाळी ६ वाजता कीर्तन व व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दि. ३१ रोजी सकाळी ९ वाजता देवीची विशेष अलंकार पुजा, सकाळी १० वाजता भजन कार्यक्रम, दुपारी १ ते ३ महाप्रसाद होणार आहे. तरी भक्तांनी या कार्यक्रमास सहभाग दर्शवावा ज्यांना देणगी किंवा अन्नधान्य द्यायचे आहे त्यांनी अन्नपूर्णेश्वरी देवस्थान मंडळाशी संपर्क साधावा, असे रवीराज हेगडे यांनी कळविले आहे.