बेळगाव : अनगोळ क्रॉस टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श मल्टीपर्पज को ऑप. सोसायटीचे कायदा सल्लागार ऍड. शंकर नावगेकर यांची कन्या व सेंट मेरीज हायस्कूलची विद्यार्थिनी तनिष्का शंकर नावगेकर हिने नुकत्याच झालेल्या दहावी बोर्डाच्या परिक्षेत जिल्ह्यात पहिली येण्याचा बहुमान मिळविला. याबद्दल तिचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन एस. एम. जाधव होते.
तनिष्का हिने या परिक्षेत ६२५ पैकी ६२० गुण (९९.२० टक्के) मिळविले आहेत. जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवून तिने बेळगाव शहराचा नावलौकिक वाढविला आहे. या यशाबद्दल तिचा चेअरमन एस. एम. जाधव व व्हाईस चेअरमन एन. वाय. कंग्राळकर यांच्या हस्ते रोख पाच हजार रुपये व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना जाधव यांनी प्रत्येक परिक्षेत मुली बाजी मारतात हे कौतुकास्पद आहे, असे सांगून तनिष्काचे अभिनंदन केले व तिला उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
शनिवार दि. २५ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक ए. एल. गुरव, दिगंबर एम. राऊळ, एन. आर. सनदी, आय. वाय. मेलगे, आर. टी. पवार, एल. एम. शानभाग, ए. सी. रोकडे, अवधूत एम. परब, पी. एस. साळुंखे, अमरनाथ के. फगरे, फत्तेसिंग पी. मुचंडी, सौ. अर्चना एन. पाटील, सौ. अंजली ए. साळवी यांच्यासह अँड. शंकर नावगेकर, सीईओ पी. बी. माळवी, सर्व शाखांचे व्यवस्थापक, सर्व कर्मचारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.