Sunday , July 26 2026
Breaking News

नियोजित वधूच्या आत्महत्येनंतर बेळगाव येथे तरुणाची आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : ज्या तरुणीसोबत लग्न करायचे होते तिच्या सोबतच लग्न ठरले आणि दोघांनीही सुखी संसाराची स्वप्ने रंगवली असतानाच नियतीने एक वेगळाच डाव मांडला. नियोजित वधूला कर्करोगाचे निदान झाल्याचे समजताच नियोजित वधूने उत्तर प्रदेश येथे आत्महत्या केली आणि विरह सहन न झाल्याने बेळगाव येथे तरुणाने आपले जीवन संपविले.
नियोजित वधूला आरोग्य संदर्भात तक्रारी येऊ लागल्या आणि वैद्यकीय तपासणीत सदर तरुणीला कर्करोग झाल्याचे निदान झाले हा आघात सहन न झाल्यामुळे तिने मृत्यूला कवटाळले. उत्तर प्रदेशमधील फतेपुर येथे राहणाऱ्या नियोजित वधूने आत्महत्या केल्याची बातमी बेळगाव येथील तरुणाला समजताच कापड व्यवसायासाठी उत्तर प्रदेशातील फत्तेपूर येथून बेळगावमध्ये आलेल्या नियोजित वराने देखील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आवेश जुबेर पठाण असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुणाने चिराग नगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *