Saturday , July 27 2024
Breaking News

बेकायदेशीरपणे देणग्या (डोनेशन) स्वीकारल्यास शाळांची नोंदणी रद्द : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : जिल्ह्यातील विनाअनुदानित किंवा अनुदानित शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारता येणार नाही. बेकायदेशीरपणे देणग्या घेतल्याचे आढळून आल्यास अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.
शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शाळांमध्ये देणगी (डोनेशन) घेतली जात असल्याच्या तक्रारी जनतेतून येत आहेत. नियमानुसार शासनाने निश्चित केलेल्या शुल्कावरच प्रवेश देण्यात यावा. देणगी बेकायदेशीररीत्या मिळाल्यास आर.टी.ई. कायद्यानुसार अशा शाळांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई देखील करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

प्रवेश शुल्क-माहिती प्रदर्शित करण्यासाठी सूचना

पालक व जनतेच्या माहितीसाठी प्रत्येक शाळेने आपल्या सूचना फलकावर प्रवेश शुल्काची स्पष्ट माहिती लिहावी.
शिक्षण हक्क कायदा-2009 च्या कलम-2(b) नुसार सर्व खासगी शाळांनी अधिसूचित शुल्क त्यांच्या शाळेच्या संकेतस्थळावर, शाळेच्या सूचना फलकावर आणि विभागीय इंटरनेट (SATS) वर पालक आणि जनतेसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामुळे पालक व सर्वसामान्यांना प्रवेश शुल्काबाबत माहिती मिळण्यास मदत होणार असून प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम दूर होणार आहे.

जनतेला तक्रारी नोंदवण्याची संधी

जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेने देणगी मागितल्यास किंवा मिळाल्यास, जनता तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा शालेय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे (डीडीपीआय) तक्रार करू शकते. लोकांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *