बेळगाव : वॉर्ड क्र. 50 येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकताच पावसाळ्याला सुरवात झाली आहे. वडगांव पाटील गल्लीच्या मागील बाजूच्या परिसरात अद्याप रस्ते झालेले नाहीत. त्याचप्रमाणे या भागात गटारी नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यात पाणी साचले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. लवकरच या रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.