Friday , June 13 2025
Breaking News

शैक्षणिक साहित्याच्या दरात घसरण

Spread the love

 

खरेदीसाठी गर्दी : कागदासाठी लागणाऱ्या बांबूचे दर उतरले

निपाणी (वार्ता) : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू झाले आहे. पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून तर गणवेशापर्यंत सगळी खरेदी सुरू झाली आहे. यावर्षी कागदासाठी लागणाऱ्या बांबूंचे दर कमी झाल्याने वह्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी जाणाऱ्या पालकांच्या खिशाला कात्री बसणार नाही.
दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीर वह्या आणि पुस्तकांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढत होत्या. त्यामुळे पालकांना महागाईचा फटका बसत होता. सध्या महागाई भडका उडालेला आहे. वह्या, पुस्तकांच्या किंमती कमी झाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्याने विविध प्रकार व आकाराच्या वह्या स्टेशनरी दुकानदारांनी उपलब्ध केले आहेत. त्यावर प्राणी, पक्षी, क्रिकेटर, अभिनेते, देव देवतांच्या प्रतिमा आहेत. क्रिकेटर आणि फुटबॉलपटूंच्या भाव चित्रांच्या वह्यांना विद्यार्थ्याकडून पसंती मिळत आहे. वह्या आणि पुस्तके तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या किमती कमी झाल्याने किंमती उतरल्या आहेत. परिणामी त्यामुळे स्कूल बॅग, ड्रॉईंग साहित्य व इतर शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी जोर वाढला आहे.
——————————————————————-
‘वह्या आणि पुस्तकांसाठी लागणारा कच्चा माल आणि कागदासाठी लागणाऱ्या बांबूचे दर कमी झाले आहेत. परिणामी कारखानदारांनी यंदा व या पुस्तकांचे दर कमी केले असून आठवडा भरापासून खरेदीसाठी गर्दी होत आहे.’
-वीरकुमार गुंडे, स्टेशनरी साहित्य विक्रेते, निपाणी
——————————————————————-
‘शालेय साहित्याच्या दरात यंदा वाढ झालेली नाही. शिवाय वह्या पुस्तकांचे दर घसरले आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.’
-किरण कोकरे, पालक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

कोगनोळी येथील टोल प्लाझाच्या केबिनला आग; लॉरीच्या इंधन टाकीचा स्फोट

Spread the love  कोगनोळी : कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावरती बुधवारी रात्री नऊ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *