Tuesday , September 17 2024
Breaking News

बिजगर्णी हायस्कूलचे एस. पी. सोरगावी यांचा निवृत्ती निमित्त सन्मान …

Spread the love

 

बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळचे, न्यू इंग्लिश हायस्कूल मधील कन्नड विषय शिक्षक एस. पी. सोरगावी हे आपल्या एकतीस वर्षेच्या दीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल संस्था, पालक शाळा, विद्यार्थी हितचिंतक मित्रपरिवार यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी इशस्तवन स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
फोटो पूजन ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर व यल्लापा बेळगावकर यांच्या हस्ते झाले.
दीपप्रज्वलन संस्थेचे संचालक पी. पी. बेळगावकर, कावळेवाडी वाचनालयचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले
या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून एस. एम. जाधव उपस्थित होते.
सौ. आर. पी. सरवणकर यांनी प्रास्ताविक करून सोरगावी यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
एस. पी. सोरगावी यांनी एकतीस वर्षे कन्नड विषयाचे अध्यापन केले. मनमिळाऊ स्वभावाचे, शांत, विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रामाणिक पणे सेवा बजावली. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले. अनेक विद्यार्थी त्यांचे उच्चशिक्षित होऊन उच्च पदावर कार्यरत आहेत
याप्रसंगी पी.पी बेळगावकर, वाय पी नाईक, शंकर चौगले, वाय एच पाटील, डी एस कांबळे, रामू गुंगवाड, एम एम जाधव, एम.बी होलमनी, परशराम भास्कर, यांनी त्यांच्या योगदानाची माहिती देऊन मनोगत व्यक्त केले. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, माध्यमिक व प्राथमिक शाळांतील शिक्षक मुख्याध्यापक, संस्था तसेच पालक विद्यार्थी हितचिंतक मित्रपरिवार यांच्याकडून भेट वस्तू, शाल, श्रीफळ, पुष्पहार, फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.
यावेळी एस पी सोरगावी यांनी कृतज्ञता व्यक्त करुन संस्था व शाळेचे आभार मानले. यापुढेही शाळेसाठी सहकार्य करु अशी इच्छा व्यक्त केली.
व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष एस. एम. जाधव, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, संचालक पी पी बेळगावकर, वाय पी नाईक, यल्लापा बेळगावकर, संस्था सचिव ए. एल. निलजकर, सौ. जयश्री सोरगावी, शंकर चौगले, डी एस कांबळे, वाय एच पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, मनोहर पाटील, उपस्थित होते.
यावेळी सर्व क्षेत्रातील‌ मान्यवर उपस्थित होते.
पी एस भाषकळ, सदानंद पावसकर, एम पी पाटील, के.पी बेळगावकर, मारुती कांबळे, उत्तम होनगेकर, बंडू भास्कर, ऍड. नामदेव मोरे, रमेश कांबळे, आदी मान्यवर पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन के आर भास्कर, तर आभार ए एम दरेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *