बेळगाव : बेळगावच्या नियती फाउंडेशनच्या वतीने गरीब विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
ताशिलदार गल्ली येथे राहणाऱ्या रचित पाटील या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. अलीकडेच त्याच्या वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याने घरचा पूर्ण भार त्याच्या आईवर आहे. अशा परिस्थितीत रचितच्या शाळेचा खर्च उचलणे या कुटुंबाला कठीण झाले असून या मुलाच्या शिक्षणासाठी नियती फाउंडेशनच्या वतीने आर्थिक सहाय्य्य करण्यात आले.
बी. इ. सोसायटीच्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या रचितला समाजातील दानशूर व्यक्तींना सहकार्य करायचे असल्यास त्यांनी नियती फाउंडेशनच्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. समीर सरनोबत हेही उपस्थित होते.