बेळगाव : आदर्श नगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या वतीने “संजीवीनी नई दिशा” या मानसिक रुग्णांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १६ जून २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कॉलेज रोड येथील महिला विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीला कोणत्या पध्दतीने हाताळायला हवे त्यांना कोणत्या पध्दतीने व्यस्त ठेवायला हवे याची माहिती तसेच त्यांचा आहार कसा असावा याबद्दलही माहिती देण्यात येणार आहे. मानसिक रुग्णांसाठी वेगवेगळ्या व्यावसायिक थेरपी शिकवल्या जाणार असून वेगवेगळे मनोरंजन कार्यक्रम सुद्धा घेण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यू विभागाचे प्रमुख डॉ. अशोक डिसोझा, जिल्हा रुग्णालयाचे मानसिक रूग्ण विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर टी आर. तसेच आहार तज्ञ प्रियांका राठोड उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम मानसिक रुग्णांसाठी खुला असून त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनीही उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सीईओ मदन बामणे आणि संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ७३४९६ ७०१४६/ ९४४८१ ९१२६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Belgaum Varta Belgaum Varta