Saturday , March 7 2026
Breaking News

अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने कल्याणोत्सवाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : सदाशिवनगर येथील श्री परमज्योति अम्माभगवान ध्यानमंदिर मध्ये अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने १७ जून २०२४ रोजी कल्याणोत्सव साजरा करण्यात येणार असून सायंकाळी चार वाजता चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळुन सदाशिव नगर येथील ध्यानमंदिर पर्यंत श्री परमज्योति अम्माभगवान श्रीमुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यानंतर कल्याणोत्सव म्हणजेच श्री अम्मा आणि श्री भगवानांच्या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर भजन संकीर्तन होईल व दीक्षा देण्यात येईल.
कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक महाआरती आणि महाप्रसाद वितरण करण्यात येईल. तरी भक्तमंडळीनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

Spread the love  बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *