बेळगाव : आज आरोग्य भारती बेळगाव शाखेतर्फे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन अनगोळ येथील संत मीरा माधव सभागृहात आयोजित करण्यात आले होते. सकाळी ठिक ६ वाजता ओमकार, दिपप्रज्वलन, पुष्परचना आणि धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रमुख पाहुणे आणि वक्त्या या नात्याने बेळगाव येथील सुप्रसिध्द डॉक्टर, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या सौ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. माय योग अकादमीच्या महिला योग साधकांनी योग नृत्य उत्कृष्टरित्या सादर केले, त्यानंतर योग पटू श्री. शिवाजीराव बेकवाडकर यांनी उपस्थितांच्याकडून योगासने करवून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मुकुंद गोखले यांनी केले. वासुदेव यानि उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक बेळगाव आरोग्य भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष सौ. हेमा अंबेवाडीकर यांनी केले. परिचय सौ. सुजाता धावणे यांनी केले. डॉक्टर सौ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार सौ. हेमा अंबेवाडीकर यांनी केले. सौ. सोनिया सरोदे आणि सुवर्णा पाटील यांनी स्वागत गीत गाईले. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना डॉ. सौ. सोनाली सरनोबत म्हणाले, आज आरोग्य जपण्यासाठी अष्टांग योग अत्यंत आवश्यक आहे, त्याच बरोबर आहार पद्धती बदलणे खूप गरजेचे, आपल्या दैनंदिन जीवनात पारंपरिक आहार सेवन करण्याशिवाय पर्याय नाही. अवती भवती पिकणारी फळे, धान्य आणि आहार वापरले पाहिजे. आपली संस्कृती जपण्याचे आवाहन केले. अकाली वार्धक्य येण्याची अनेक कारणे त्यांनी सांगितली.
श्री. प्रकाश यांनी आभार प्रदर्शन केले. सौ. श्रीदेवी बुडवी, सौ. माया कोष्टी यांच्या शांती मंत्राने कार्यक्रम संपन्न झाला.