बेळगाव (वार्ता) : मंदिरेही समाज हितासाठी आदर्श ठरावीत. सुळगा येथील मळेकरणी देवीचे मंदिर हे त्यापैकीच एक आहे, असे प्रतिपादन एन. एस. चौगुले याने केले ते सुळगा (हिं.) येथील मळेकरणी देवीच्या मंदिराचा उद्घाटन कार्यक्रमात उद्घाटक या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण चौगुले होते. हा कार्यक्रम सोमवार (दि. 10) झाला.
प्रास्ताविक एन. वाय. चौगुले यांनी केले. कार्याचा आढावा चौगुले यांनी सादर केला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिवप्रतिमा पूजन यल्लाप्पा जाधव, गणेश प्रतिमा पूजन विनय कदम, लक्ष्मी प्रतिमा पूजन हर्षल चौगुले, सरस्वती प्रतिमापूजन मंजुळा चौगुले प्रवेशद्वार उद्घाटन उमाजी पाटील, हॉल उद्घाटन रामचंद्र मन्नोळकर, चौकट पूजन बाळू देसूरकर, उत्तम तरळे, गाभारापूजन लोकेश भातकांडे, मोहन चौगुले, कळसपूजन प्रकाश कणबरकर यांच्या हस्ते 8 करण्यात आले दिपप्रज्वलन कामधेनु सोसायटीच्या संचालिकांच्या हस्ते करण्यात आले.
नूतन वास्तूचे उद्घाटन एन. एस. चौगुले, बाळकृष्ण कदम, बेळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यांनी एन. एस. चौगुले, अशोक पाटील, पुनम कलखांबकर यांची भाषणे झाली.
सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. आभार मारुती चौगुले यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष निर्मला कलखांबकर, सदस्य मारुती पाटील, यल्लाप्पा कलखांबकर, महादेव कंग्राळकर, परशराम तुपट, परशुराम कदम, निंगाप्पा देसुरकर, कृष्णा पाटील, प्रकाश पाटील, एल. जी. चौगुले, किरण पाटील, दीपक पाटील, उमेश पाटील, यल्लाप्पा पाटील, भरमा चौगुले, डॉ. गणपत पाटील, परशराम पाटील, टोपाणा पाटील, लक्ष्मण कोवाडकर, मंदिर जिर्णोद्धार कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, देवस्की पंच कमिटी, सदस्य युवक मंडळांचे कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …