खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गाणिग समाजाच्या विद्यार्थी वर्गाला 2 ए प्रमाणपत्र तसेच सिधुत्व प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीसाठी खानापूर तालुका गाणिग समाज अभिवृध्दी संस्थेच्यावतीने उपतहसीलदार के. आर. कोलकार यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गाणिग समाजाच्या विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी 2ए प्रमाण पत्र तसेच सिधुत्व प्रमाणपत्र देण्याची तरतुद करण्यात आली आहे. मात्र तहसीलदार अथवा इतर कार्यालयातून अडचण निर्माण करत आहेत.
याबाबत अल्पसंख्याक तसेच हिदुळीद वर्ग, समाज कल्याण खाते, खंदाय खाते, कल्याण इलाखे आदी खात्यांना माहिती देऊनही प्रमाणपत्र देण्यात दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा तहसीलदारांनी याची दखल घेऊन गाणिग समाजाला 2 ए व सिधुत्व प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना बेळगांव जिल्हा गाणिग समाज अभिवृध्दी संस्थेचे अध्यक्ष रमेश होटगी, तालुका अध्यक्ष आडव्यापा कोटी, तालुका प्रधान कार्यदर्शी प्रकाश होसमनी, गंगाधर मड्डीमणी, कल्लपाण्णा गाणगी तसेच गाणिग समाजाचे नेते, नागरिक उपस्थित होते. यावेळी उपतहसीलदार के. आर. कोलकार यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठपुरावा करून न्याय देण्याचे आश्वासन दिले.
